श्रीगुरुचरित्र
श्रीगुरुचरित्र या पोथीत परमेश्वर स्तुती, श्रीगुरु स्तुती, श्रीगुरु महिमा, स्थान महिमा, आचार संहिता [कसे वागावे, कसे वागू नये] आणि त्याला संलग्न कथानक अशी मांडणी ५१ किंवा ५२ अध्यायांत दिलेली आहे. प्रत्येक अध्यायात परमेश्वर स्तुती, श्रीगुरु स्तुती आणि गुरुमहिमेच्या ओव्या कमी अधिक प्रमाणात आढळतात. त्या वाचकांना सहजरीतीस मिळाव्या / सापडाव्या हा प्रयत्न प्रस्तुत पुस्तकात केलेला आहे. इतर ओव्यांचा संक्षिप्त अर्थ दिलेला आहे.